Monday, January 31, 2022

 मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सलग शेतजमिनीवर, बांधावर तसेच पडीक शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जुन ते 30 नोव्हेंबरपर्यंत ठरवून देण्यात आला होता. सन 2021-22 मध्ये फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण विचारात घेता फळबाग लागवडीसाठी हा कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रोपवाटीकेवर आंबा, चिकु, पेरू, सीताफळ, मोसंबी, का. लिंबु. इत्यादी फळपिकांचे एकुण 3 लाख 46 हजार 342 कलमे-रोपे उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...