Friday, December 3, 2021

 अवसायकाचे पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अे) अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांच्या कामकाजासाठी अवसायकाची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थालातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 2 मजलाशिवाजी चौक लातूर यांच्या कार्यालयात 10 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 14 जानेवारी 2022 पर्यंत आहेअसे आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.


अर्ज करण्यास पात्र व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकटस. चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी. राष्ट्रीयकृत बँकाग्रामीण बँकाभूविकास बँकाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाव्यापारी बँकानागरी सहकारी बँकाराज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी. सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी. महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी. कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 5 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावा.

 

अर्जदार व्यक्तीने पुढीलप्रमाणे अर्हता धारण केलेली असावी. अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरिक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस् व चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादीमध्ये (Black List) समावेश केलेला नसावा. ही व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधकसहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नांदेड, लातूरउस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील रहिवासी असावा. सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतील.

 

प्राप्त अर्जाची छाननी 31 जानेवारी 2022 रोजी पूर्ण करुन 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हरकती मागविल्या जातील. त्यानंतर 14 मार्च 2022 रोजी हरकतीचा निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करुन 21 मार्च 2022 रोजी अंतीम नामीका प्रसिद्ध करण्यात येईल.


याबाबतची जाहीर सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. मुकेश बारहाते जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...