Friday, November 12, 2021

सुधारित वृत्त

 नायगाव नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण, सोडतीबाबत आक्षेप, हरकती, सूचना असल्यास सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  नायगाव नगरपंचायतीच्या सुधारीत आरक्षण व सोडत निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांच्याकडे शुक्रवार 12 ते मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावीत. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार नायगाव नगरपंचायतीच्या परिक्षेत्रातील नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी नायगाव नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...