Friday, November 26, 2021

मतदार जागृती अभियानार्तंगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाचा सहभाग

 

मतदार जागृती अभियानार्तंगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रशासनाचा सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मतदार जागृती अभियानार्तंगत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले.

नांदेड  जिल्हा प्रशासन व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियानार्तंगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला आौरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी (पुनवर्सन) आकाश इस्टिट्यूट नांदेड शाखेचे व्यवस्थापक सुबोध कुमार,, सिद्धार्थ नंदा, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर युवक युवतींनी  नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री माने यांनी केले .

उपआयुक्त पांडुरंग कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले, मतदार यादीत केवळ नाव नोंदणीच आवश्यक नसून त्यातील माहिती कशी अचूक भरता येईल याकडे लक्ष द्यावे, तसेच मयत झालेल्या मतदाराची नावे वगळण्यासाठी संबंधित नातेवाईकांनी मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याकडे अर्ज करावा.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या  व्यक्तींनी आपली नावे मतदार यादीत नोदविण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन आकाश इस्टिट्यूटचे व्यवस्थापक श्री जगदीश यांनी केले तर आभार सुबोध कुमार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धार्थ नंदा व कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.

0000

 

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...