Friday, September 24, 2021

 ः प्रेसनोट:


राष्ट्रीय लोकअदालत 
दि. 25 सप्टंेबर, 2021 रोजी

नांदेड:- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे दिनांक  25/09/2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

  सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 

  याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम, वाहतूक शाखा, व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

  या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्टीªय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मा. श्री श्रीकांत ल. आणेकर,  प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व न्यायाधीश श्री. आर. एस. रोटेे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.. 
  तरी सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 25/09/2021 रोजी होणाÚया राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपस्थित राहून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...