Thursday, September 23, 2021

समयबध्द शिष्यवृत्ती महाविशेष मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 23 :- मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या करिता सन 2021-22 या वर्षातील  एकच अभियान विद्यार्थी कल्याण अंतर्गत 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान  मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना समयबध्द शिष्यवृती माह विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत.या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 8 वी फक्त मुलीकरिता (अनु.जाती/विजाभज विमाप्र/इमाव स्वतंत्रपणे) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 8 वी  10 पर्यंतच्या मुलींसाठी आहे (अनु.जाती/विजाभज विमाप्र/इमाव स्वतंत्रपणे) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृती योजना . परीक्षा फी योजना इयत्ता 10 (अनु.जाती/विजाभज विमाप्र) भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना अनु.जाती इयत्ता 9 वी ते 10 गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 10 (अनु.जाती/विजाभज विमाप्र) इयत्ता 1 ली 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.इयत्ता 1 ली 10 वीमध्ये शिकणाऱ्या विजाभज (DNT) च्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना. विशेष मोहिमे अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना शिष्यवृत्ती बाबत माहिती देणे.शिष्यवृत्ती धारक पालक गावातील समाजसेवक प्रतिष्ठीत व्यक्तींना या योजनांची माहिती देवून प्रचार व प्रसिध्दी मध्ये सहभागी करुन घेणे.मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेणे ग्रामसभेमध्ये योजनाची माहिती देणे.विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करिता आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार करणे यासाठी जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचे बँकखाते संबंधित यंत्रणा तहसिलदार कार्यालय सर्व तालुके यांनी विद्यार्थ्यांना सन 2021-22 जातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाण देणे तसेच बँक खाते उघडण्याकरिता बँक मॅनेजर यांना निर्देश देणे.

कागदपत्राची पुर्तता होताच 1 ते 10 ऑक्टोबर  पर्यंत शिष्यवृत्ती  प्रस्तावाचे संकलन करणे व प्रस्ताव तपासणी करून परिपूर्ण प्रस्ताव विहित नमून्यात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.याशिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी केले आहे. 

000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...