Sunday, August 15, 2021

 

सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या विकासाचे हे प्रतिक

- पालकमंत्री अशोक चव्हाण-          

किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण 

नांदेड दि. 15 (जिमाका):- सामान्य माणसाला केंद्र स्थानी ठेवून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शासनाच्या सेवा सुविधा प्रभावीपणे पोहचल्या जाव्यात यासाठी वेळोवेळी आपण दक्षता घेत आलो आहोत. तेलंगनाच्या सिमेवर असलेल्या किनवट व माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पध्दतीने पोहचाव्यात यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी भागाला आपतकाल प्रसंगी तात्काळ संपर्कात राहावे यासाठी उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देवू अशी घोषणा त्यांनी केली. 

 

यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथून जि. प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सांवत, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. 

जिल्ह्यातील 16 तालुके 8 उप विभागीय कार्यालये ई-प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे आज आपण वेगवेगळया ठिकाणी असूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत.  तेलंगना सीमेवर असलेल्या किनवट सारख्या आदिवासी भागातील हे कार्यालयही आता सक्षम व सुसज्ज झाले असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

सामान्य जनतेच्या महसुली सेवेचे हे केंद्र ठरावे

-         महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. सर्व सामान्य जनतेच्या महसुली सेवा सुविधा या अधिकाधिक सुलभ व्हाव्यात यासाठी महसुल विभाग प्रयत्नरत आहे. नागरिकांच्या सातबाऱ्यापासून ते पिक पेऱ्यापर्यत, विविध आपत्कालिन परिस्थतीच्या नियोजनापासून ते  तातडीने करावयाच्या योजनापर्यत कामाची जबाबदारी ही महसूल यंत्रणेवर आहे. यासर्व सोयी-सुविधा किनवट येथील जनतेपर्यत सुलभ पध्दतीने पोहचविण्यसाठी ही नवीन प्रशासकीय इमारत महसुली सेवेचे प्रतिक ठरेल असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील कोरोना काळातील सर्व आव्हाने समर्थपणे पेलून जिल्ह्यात इतर विकास कामांवरही तेवढेच प्रभावीपणे काम करुन दाखविले आहे. ऑनलाईन सातबारा, 8 अ, 2016 चे फेरफार, ई-पिक पाहणी, तलाठी गावे त्यांचा सज्जा ही सर्व कामे शिस्तबध्द पध्दतीने सुरु असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा त्यांनी गौरव केला.  यावेळी महसुल राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम यांची यथोचित भाषणे झाली.  

0000





No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...