Friday, June 18, 2021

 

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  केंद्र शासनाने‍ आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना 2020-21 ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले आहे. ही योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आहे. याचा कालावधी सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाचा आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.mofpi.nic.in  PMFME या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाच्या (02462-284252) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

जिल्हयासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. या योजनेअंतर्गत अन्न पक्रिया उद्योगासाठी सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद 4 लाख रुपयापर्यंत अनुदान देय राहील. योजनेतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नविन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रीया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतो. सद्यस्थितीत वैयक्‍तिक सुक्ष्म अन्न पक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहेत. गट लाभार्थींनी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज निश्चित केलेल्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी सादर करता येतील, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...