Thursday, April 29, 2021

राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन

 

                            राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचे

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production) तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे उद्घाटन राज्याचे उप मुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले.

याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्योगराज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ सांख्यिकी संचालक, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, अर्थ सांख्यिकी संचालनालय उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक

विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ उताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे

देशातील ओद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पन्नामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा

हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे. देशातील, राज्यातील औद्योगिक प्रगती

मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योगजगतास, याक्षेत्रातील

संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाने

दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्या खालील अर्थ सांख्यिकी

संचालनालय, उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

राज्यामधील निवडलेल्या ५६८ कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेबपोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्रवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...