Wednesday, February 17, 2021

 

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि.17, (जिमाका) :- भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्यापपर्यंत www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत. आवश्यक त्या कागदपत्रासह हे अर्ज आपल्या महाविद्यालयात सादर करावे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंति ठेवू नयेत, असे झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल. 

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयाच्या लॉगीनवर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित ठेवू नयेत. असे झाल्यास सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजश माळवदकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...