Tuesday, February 23, 2021

 

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना

आता अधिनियमातील शक्तीचे पाठबळ

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता यावा व कर्तव्य पार पाडता यावीत यासाठी ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तसे आदेश त्यांनी आज निर्गमीत केले. 

याचबरोबरच सर्व नागरिक, आई-वडिल, पालक, प्रिंटींग प्रेस, पुरोहित (सर्व धर्मिय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक, मंगल कार्यालय तसेच लग्न कार्याशी जे कोणी संबंधित व्यावसायिक जर बालविवाहला चालना देतांना, त्यांच्यासाठी सहकार्य करतांना, लग्नाचे विधी करतांना आढळतील अथवा या कार्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करतील त्यांना दोन वर्षापर्यंत एवढ्या कालावधीचा सश्रम कारावास शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर अशा बालविवाहस उपस्थित राहणाऱ्या व्यक्ती किंवा यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश आहे. 

विवाह करणाऱ्या व्यक्ती यात कायदानुसार सज्ञान म्हणजेच मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 असल्याची खातरजमा करुनच विवाह संबंधित कामे करावीत. शिवाय या संबंधितची माहिती फलक दर्शनी भागावर डकविण्याबाबतही आदेशात सांगितले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या अधिनियमाच्या कारवाईबाबत तसे स्पष्ट आदेश मंडप डेकोरेशन व्यवस्थापक, सर्व आचारी-केटरर्स, सर्व प्रिंटींग प्रेस, सर्व पुरोहित सर्व छायाचित्रकार, सर्व मंगल कार्यालय व्यवस्थापक यांच्या नावे काढली आहेत.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...