Saturday, January 9, 2021

 

जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया

907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान 

नांदेड दि. 9 (जिमाका) :- जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण 1 हजार 309 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार होते. यापैकी मुखेड तालुक्यातील जांब आणि कंधार तालुक्यातील आलेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रद्द झाली. जिल्ह्यात प्रत्यक्ष 1 हजार 13 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली. यातील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. 

1013 ग्रामपंचायतींपैकी पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 85 आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जागांपैकी काही जागेसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्याने व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतींची संख्या 21 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 907 एवढी आहे. 

एकुण जागांची संख्या 8 हजार 617 एवढी असून एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 102 तर माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशपत्र उरल्याने बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या 1 हजार 653 तर प्रत्यक्ष जिल्ह्यात मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकुण 6 हजार 862 आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...