Saturday, December 19, 2020

 

पणन महासंघाची भोकर, हदगाव येथे

कापूस खरेदी सुरु ; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात भोकर व हदगाव तालुक्यात दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्यादित विभागीय कार्यालय नांदेडद्वारा भोकर व हदगाव येथील दोन कापूस खरेदी केंद्रावर पणन महासंघाची कापुस खरेदी सुरु आहे. या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी कापूस आणताना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करुन कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत लघुसंदेश प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापुस विक्रीसाठी संबंधीत केंद्रावर आणावा. जोपर्यंत एफ.ए.क्यू दर्जाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरी शिल्लक आहे तो संपुर्ण कापुस विक्री होईपर्यंत सदरचा एफ.ए.क्यु.दर्जाचा कापुस पणन महासंघ खरेदी करणार आहे.

 

त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या एफ.ए.क्यु दर्जाच्या कापसाची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करुन लघु संदेश प्राप्त झाल्यानंतर पणन महासंघाच्या कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी आणावा. जेणेकरुन शेतकऱ्यांची गर्दी होवून गैरसोय होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ नांदेडचे विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...