Wednesday, November 25, 2020

 

कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी

स्वत:हून उपचारासाठी पुढे यावे

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) 25 :- कोविड-19 मुळे ग्रामीण भागात लोकांच्या मनात एक भिती निर्माण झाल्यामुळे असंख्य लोक ज्यांना इतर गंभीर आजार आहेत ते आजारही लपवित आहेत. रुग्णांनी आपले गंभीर आजार न लपविता विश्वासाने पुढे आले तर अनेक आजारांवर वेळीच उपचार करुन पूर्णत: बरे होता येईल. ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या यंत्रणेतील आशा वर्कर व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून कुष्ठरोग, क्षयरोग सारख्या रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेळीच इलाज करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

संयुक्त कुष्ठरोग शोध मोहिम व क्षयरुग्ण शोध मोहिम 2020 च्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. अमृत चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

कुष्ठरोग हा मायकोबॅक्टोरियम या जिवाणुमुळे होणारा सौम्य सांसर्गिक आजार आहे. यात मुख्यत: त्वचा व मज्जा बाधीत होतात. याची वाढ अत्यंत सावकाश होते. तो कोणत्याही स्त्री व पुरुषास होऊ शकतो. याची लागण झालेल्या रुग्णाने औषधोपचार घेतला नाही तर त्या रुग्णामार्फत याचा प्रसार होतो. याचा प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे खास ही मोहिम राबविली जाते. या मोहिमेत प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनाही शोधले जाणार आहे शिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहेत. दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, ताप असल्यास, वजनात लक्षणीय घट होत असल्यास किंवा थुंकी वाटे रक्त येत असल्यास क्षयरोगासंबंधित तात्काळ चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. वेळीच इलाज केल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो.  

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...