Monday, November 2, 2020

 

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती  योजनचे

ऑनलाईन  अर्ज  30 नोव्हेंबरपर्यत करावेत

नांदेड (जिमाका) दि. 2 :- अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती  योजनचे ऑनलाईन  अर्ज  भरण्याची प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती. सन 2020-21  या वर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली असून www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन  अर्ज  भरावेत, असे आवाहन  शिक्षणाधिकारी (मा.) बालासाहेब कुंडगीर यांनी केले आहे. 

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2020-21 साठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन बालासाहेब कुंडगीर शिक्षणाधिकारी (मा.)  यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...