Tuesday, October 20, 2020

 

 जवान गणेश पिराजी चव्हाण यांना

कुरुळा ग्रामस्थांचा अखेरचा निरोप 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- कंधार तालुक्यातील कुरुळा येथील बीएसएफचे जवान गणेश पिराजी चव्हाण हे मेघालय येथे सेवा बजावत होते. मागील काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारातून ते सावरु न शकल्याने 18 ऑक्टोंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे शव मेघालय येथून हैद्राबाद येथे व हैद्राबाद येथून ते आज कुरुळा या गावी पोहचले. कुरुळा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना आज साश्रृनयनाने निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्याने मातृभूमिच्यासेवेत तैनात असलेला एक जवान आपण गमविला आहे या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात मी सहभागी  आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. शासनाच्यावतीने कंधारचे उपविभागीय दंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसिलदार विजय चव्हाण यांनी जवानाच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मास्क व इतर सुरक्षितता घेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी दिली.

00000




 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...