Monday, October 26, 2020

 

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील ती वर्षासाठी नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार, इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री. गिरी, तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते.

000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...