Thursday, August 27, 2020

 


वृक्ष लागवडीतुन प्रादेशिक परिवहन कार्यालय

परिसराचा कायापालट करु  

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

 

नांदेड (जिमाका) दि. 27:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  रिकाम्या परिसरात असलेल्या जागेवर जी वृक्ष लागवड केली आहे त्याची काळजीपुर्वक निगा राखून सर्वांच्या प्रयत्नातून या परिसराचा कायापालट केला जाईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. राज्य शासनाच्या ''अटल आनंदवन घनवन योजना 2020'' अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात सहाशे वृक्षांची मियावाकी (सघन वन) पध्दतीने दोन प्लॉटवर लागवड नुकतीच करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर्षी एकत्र येऊन श्रमदानातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात वृक्षांची जोपासना केली आहे. वृक्ष लागवडीसाठी सुमारे 25 ते 30 प्रजातींची 600 रोपे मियावाकी पध्दतीने लावण्यात आले. रोपांच्या लागवडीसाठी परिसराची साफसफाई, वृक्ष लागवड व जोपासना या संपूर्ण प्रक्रियेत या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य सांभाळून श्रमदानाद्वारे त्यांनी यावर्षीचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

 

इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नातून कार्यालयाचा परिसर हिरवागार करता येऊ शकतो हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कृतीतून दाखवले आहे. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नियमित आपल्या कामाचा काही वेळ लागवड केलेल्या वृक्षांची निगा राखण्यासाठी देतात. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल जाधव, रोहीत काटकर व अनंत भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...