Friday, July 3, 2020


वृत्त क्र. 602   
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत
अन्न धान्य वितरणास मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 3 :- आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या पात्र लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांस अन्न धान्य वितरणास शुक्रवार 10 जुलै 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनी अद्याप रास्त भाव दुकानातून अन्न धान्य उचल केली नाही, त्यांनी 10 जुलै पर्यंत रास्त भाव दुकानातून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, विना शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना मे व जून 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत प्रति व्यक्ती प्रति महा 5 किलो तांदूळ व प्रति कुटुंब प्रति महा 1 किलो अख्खा हरभरा यानुसार माहे मे व जूनचे एकत्रित प्रतिव्यक्ती 10 किलो तांदुळ व प्रति कुटूंब 2 किलो अख्खा चना लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (प्राधान्य कुटुंब व अंत्योदय) योजनेतील लाभार्थ्यांना माहे जूनसाठी प्रती सदस्य प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत व मे व जूनची प्रति कुटुंब तुरदाळ किंवा चनादाळ प्रती महा 1 किलो याप्रमाणे दोन महिन्याची 2 किलो दाळ मोफत जूनमध्ये वितरीत करण्यात येत होती. या दोन्ही योजनेतील काही लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत अन्नधान्य उचल न केल्याने शासनाने विशेष बाब म्हणून 10 जुलै 2020 पर्यंत अन्न धान्य प्राप्त करुन घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...