Sunday, June 14, 2020

*आज १५ जून सा. ६.३० वा* *जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे*
*फेसबुक लाईव्हवर*
सायंकाळी ६.३० वाजता क्लिक करा
https://www.facebook.com/dionanded/
या लिंकवर.
*सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत.*
कोरोनाशी लढ्यात परिपूर्ण विजय मिळविण्यासाठी आपण सारेच प्रयत्नशील आहोत. हा असा एक लढा आहे ज्यात आपले सर्वच नागरिक आशा लावून बसले आहेत. आपला जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा लागेल. यासाठी प्रत्येकाच्या कृतीत कोरोना होऊ नये यासाठी सुरक्षिततेचे काही बदल उतरावे लागतील. न चुकता मास्क वापरणे, कोणत्याही नवीन वस्तूला हात लागल्यास साबणाने हात स्वछ करणे, मनस्वास्थ्य टिकविणे, आयुष मंत्रालयाने सुचविलेले उपाय अवलंबीने, प्राणायाम, योगाचा सराव या अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत.
कोरोनाशी लढ्यात आपल्याला यशस्वी होण्यासाठी शासनाच्या प्रयत्नात स्वतःहून सहभागी व्हावे लागेल.
आपण यात कसे योगदान देऊ शकतो, देशासमोर निर्माण झालेल्या या आव्हानात नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य कसे बजावू शकतो याचा विचार करावा लागेल.
आज फेसबुक लाईव्हवर आपले जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे आपल्याशी सायंकाळी ६.३० वाजता या महत्त्वपूर्ण विषयावर सुसंवाद साधतील.
*आज १५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता क्लिक करा* https://www.facebook.com/dionanded/
या लिंकवर.
*सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत*.

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...