Monday, May 25, 2020


जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज नियमितपणे सुरु ;
नाव नोंदणी, आर्थिक सहायतेसाठी कागदपत्रे सादर करावीत
नांदेड (जिमाका) दि. 25 :-जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज नियमितपणे सुरु झाले असून प्राथमिकतेनुसार कामांचा निपटारा करण्यात येत आहे. ज्या माजी सैनिकांचे निधन झाले आहे त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थीक सहायताच्या कामांसाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात नमूद कागदपत्रे घेवून यावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
कोराना प्रादुर्भावामुळे चालू असलेल्या लॉकडॉउन कालावधीत नांदेड जिल्हयातील बऱ्याच माजी सैनिकांची नाव नोंदणीचे व इतर कामे प्रलंबित झालेली आहेत. दुर्देवाने काही माजी सैनिकांचा या कालावधीत दु:खद निधनही  झाले आहे.  कार्यालय दुरध्वनीवरुन सर्व प्रभावित  माजी सैनिकांच्या संपर्कात असून योग्य ते मार्गदर्शन व तातडीचे सर्व कार्य करीत आहे.
ज्या माजी सैनिकांचे निधन झालेले आहे त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थीक सहायताच्या कामासाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात पुढीलप्रमाणे कागदपत्रे घेवून यावीत. यामध्ये माजी सैनिकाचे ओळखपत्र जमा करण्यासाठी,  मुळ डिस्जार्ज बुक, पीपीओ व बँक पासबुक (माजी सैनिकाचे व पत्नीचे), वारस पत्नीचे 3 फोटोग्राफस व आधार कार्ड,  AGI Claim साठी Extended Army Group Insurance Cert, मृत्यु प्रमाणपत्र मुळ या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित 3 प्रतिसह शक्यतो सर्वांनी सकाळी 10 ते 2 यावेळेत मोबाईल क्रमांक 9403069447 वर संपर्क करुन यावे, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...