Monday, May 11, 2020


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ;
जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला ऑनलाईन संवाद
नांदेड, (जिमाका) दि. 11 :- कोरोना प्रतिबंधात्मक संदर्भात विविध उपाययोजना नांदेड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सोमवार 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वा. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून प्रथमच ऑनलाईन संवाद साधून त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कोरोना प्रतिबंध संदर्भात केलेल्या उपाययोजना आणि एकूणच पत्रकारांच्या मनात असलेल्या शंकाचे  निरसन ऑनलान संवादाच्या माध्यमातून यावेळी केले. प्रथमच जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांसोबत आणि पत्रकारांनीही प्रथमच जिल्हाधिकारी यांच्या सोबत ऑनलाईन हा संवाद साधला. त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे उपस्थित होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील एकूण 72 पत्रकारांनी ऑनलाइन संवादाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.



No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...