Thursday, May 21, 2020


कोरोनाचे एकुण 41 रुग्ण उपचारांने बरे झाली
आज 5 रुग्ण बरे तर 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु
नांदेड, दि. 21 (जिमाका):- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर मधील 1 रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोवीड सेंटर येथील 1 रुग्ण असे एकुण 5 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 110 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 41 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
            जिल्ह्यात एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 26 हजार 716 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 827 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 461 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून बुधवार 21 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 66 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 64 रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे. घेतलेल्या एकुण स्वॅबपैकी 110 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
            आतापर्यंत एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 41 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे 62 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1 रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.  
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...