Thursday, May 7, 2020


रक्तदाब, मधुमेह रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी ;
एकुण 1 हजार 329 जणांचा अहवाल निगेटिव्ह  
तर 482 व्यक्तींचा क्वांरटाईन कालावधी पूर्ण ;
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 218 जण निगेटिव्ह  
नांदेड, (जिमाका) दि. 7 :- कोरोना विषाणु संदर्भात गुरुवार 7 मे 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी पुढीलप्रमाणे दिली आहे. जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 92 हजार 86 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 1 हजार 440 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 329 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 51 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. या स्वॅब पैकी 35 व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकुण 1 हजार 457 क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींपैकी 482 व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधीत पूर्ण झाला आहे.
पॉझिटिव्ह 35 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 22 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित 7 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले आहेत तर तीन रुग्ण फरार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या 35 पॉझिटिव्ह रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील 304 व्यक्तींपैकी 265 रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या व्यक्तीपैकी 218 व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होत. त्यापैकी 218 व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...