Thursday, April 16, 2020

सुधारित बातमी

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने
रक्तपेढीने  राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनांचे पालन करावे

नांदेड दि. 16 :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तपेढीने घ्यावयाची काळजी याबाबत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन नांदेड जिल्हयातील रक्तपेढयांनी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मा. ज. निमसे यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरावेळी (सोशल डिस्टंसिंगचे) सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे. परदेश प्रवासाचा इतिहास, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क, कोरोना झालेल्या व्यक्ती यांच्याकडून केलेले रक्तदान शिबिरात तसेच रक्तपेढीत रक्त संकलित करू नये. रक्तसंकलानावेळी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे वापरापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे.

रक्तपेढीचे कर्मचारी, अधिकारी यांनी नियमितपणे साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. रक्तपेढीचे काम करतेवेळेस हात मोजे व मास्क यांचा वापर करावा. रक्तपेढीत येणाऱ्या व्यक्तींना मास्क वापरण्यांची सक्ती करावी. त्यांच्या वापरासाठी रक्तपेढीच्या प्रवेशद्वारात हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे. रक्तदान शिबिराच्यावेळी याप्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

कोणत्याही परिस्थितीत शिबिराच्यावेळी गर्दी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी. कॅम्प ,जागा व परिसर स्वच्छ असावा. रक्तपेढीद्वारे कोविड-19 बाबत कॅम्पच्या ठिकाणी जनजागृती करावी. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी रक्तपेढयांने विशेष काळजी घेऊन अधिकाधिक रक्त संकलन करावे, असेही आवाहन जिल्हयातील सर्व रक्तपेढयांना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...