Monday, March 23, 2020


शासन आणि आपण एकत्रितपणे कोरोना विषाणूचा मुकाबला करु या....आणि
महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला कारोनाच्या भयंकर विषाणू पासून बाहेर काढू यात
- पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
नांदेड, दि. 23:- राज्यासह मराठवाड्यातील नागरिकांनी तसेच नांदेड वासियांनी कोरोना विषाणूवर मात करु यात यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. शासन आणि आपण एकत्रितपणे कोरोना विषाणूचा या लढ्याचा मुकाबला करु यात....आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला कारोनाच्या भयंकर विषाणूपासून बाहेर काढू यात... युध्द पातळीवरचा मुकाबला करु यात...! असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  केले.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आवाहन करतांना म्हणाले की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात फक्त पाच टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय कार्यालयात काम करण्यासाठी  मुभा देण्यात आली आहे. सर्वच धार्मिक स्थळ बंद करण्यात आलेली आहेत, असा निर्णय शासनाने घेतला आहे. औषधी, मास्क औषध संलग्नित याचा काळा बाजार, ज्यादा भावाने विक्री होत असेल तर त्यांच्यावर शासनाचा निर्णय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जनता कर्फ्युला नांदेडकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नांदेडकरांचे हार्दिक अभिनंदन केले. दिनांक 22 मार्च, 2020 रोजी  नांदेड जिल्ह्यातील शंभर टक्के मार्केट बंद राहिले, राज्य परिवहन महामंडळाची बसेस, खाजगी वाहने बदं राहिले आहेत. आगामी काळात अशाच प्रकारचे सहकार्य नांदेडकरांकडून अपेक्षित आहे. तरच करोना वायरसला मात करण्यामध्ये आपण यशस्वी राहू यामध्ये शंका नाही.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शक सुचना प्रसिध्द केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली तर यशस्वी आपण होवू. यापुढचे आठ दिवस अधिक महत्वाची आहेत. नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
सीटी बस, राज्य परिवहन बस, खाजगी वाहने यांची वाहतूक रविवार 22 मार्च, 2020 च्या मध्यरात्रीपासून संपूर्णपणे मंगळवार 31  मार्च, 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. यातून नागरिकांची थोडी गैरसोय होणार आहे. परंतु, आपले ठरलेलंच आहे की, आपण घराबाहेर पडायच नाही. याचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे.
जिल्ह्यात 144 कलम जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. कायद्याने बंधनकारक आहे. अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.  अनावश्यक गर्दी करता येणार नाहीत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी  144 कलम ही तरतुद आवश्यक आहे. आपण सर्वांनी कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. पालन केल्यास त्यांच्याविरुध्द कार्यवाही निश्चितच होणार अशी या कलमात तरतूद आहे.  याचा हेतू एवढाच आहे की, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असणार आहे.
बँका, बँकेशी संबंधित सुविधा, किराणा, फळ, भाजीपाला, किरणा दुकान आदी अशा सुविधा, रुग्णालये, औषधांची दुकाने, बंदरे, माध्यमांची प्रतिनिधी यांची वाहने वगळण्यात आली आहे. पेट्रोल पंप,  टेलिफोन, इटरनेट सुविधा, इलेक्ट्रीकल, पाण्याच्या सुविधा, विद्युत सुविधा, अन्नधान्याचे गोडवून, आयटी सुविधा याच्याशी संलग्नित सेवा, ट्रक्स, वाहतूकसेवा यांना निर्बंधातून वगळण्यात आले आहेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...