Friday, March 13, 2020


किनवट तालुक्यातील महिलांसाठी
बंजारा विव्हिंग आर्टवर आधारीत
तीस दिवसाचे मोफत प्रशिक्षण
नांदेड दि. 13 :-  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ द्वारा पुरस्कृत आणि मिटकॉन नांदेड कार्यालयामार्फत आयोजित किनवट तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी बंजारा विविंग आर्टवर आधारित 30 दिवसीय निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात 16 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 या कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात बंजारा विविंग आर्टमधील तंत्र, विविध टाक्याचे प्रकार, टाक्याचे संयोजन व कामाची पद्धत, विविध आकृत्याचे रेखाटन व रंगसंगती, बंजारा विविंग आर्टसाठी आवश्यक विविध उपकरणांची माहिती, कापडाची निवड अशी तांत्रिक माहिती त्याच बरोबर विविध शासकीय योजनाची माहिती, शासनाचे औद्योगिक धोरण याची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी प्रशिक्षणार्थी किनवट तालुक्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे अशी आहे. प्रशिक्षणार्थीची नांदेड येथे निवासी राहण्याची तयारी असवी. त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थीस 150 रुपये प्रति दिवस याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
इच्छुक प्रशिक्षणार्थी शाळेचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्डची प्रत, पासपोर्ट छायाचित्र, आधारकार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आदी माहितीसह मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. तळमजला उद्योग भवन इमारत, औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, नांदेड येथे मुख्य व्यवस्थापक राहुल शेळके मो. 9764173848, 7020248518 व सहायक सुभाष जाधव मो. 9822740364 वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य व्यवस्थापक, मिटकॉन नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...