Thursday, February 27, 2020


कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नांदेड, दि. 27 :- जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.  
कोरोना सदृश लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांसाठी नांदेड जिल्हा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वरील प्रकारची लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालय नांदेड संबंधित आरोग्य तपासणी सेवेचा तात्काळ लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांनी केले आहे.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे, डॉ. विद्या झिने, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. बिसेन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, श.च.वै.म. (Dean) यांचे प्रतींनिधी डॉ. भुरके हे उपस्थित होते.
जगातील चीन या देशात मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा करोना विषाणुचा प्रसार मोठ्या प्रमाणात  झाल्याचे दिसून आले आहे. चीन या  देशात न्युमोनियाच्या रुग्ण संख्येत अचानकपणे मोठ्या प्रमाणात झालेली  वाढ ही (करोना) या विशानुजन्य आजाराचे मुख्य कारण असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकारचे रुग्ण चीन मधील हुबेई प्रांतातील वुहान या शहरात 31 डिसेंबर 2019 मध्ये आढल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर थायलंड,जपान व इटली या शहरातूनही  या आजाराची रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले. या विषाणूची आतापर्यंत 80 हजार 239  इतक्या रुग्णांना याची लागण झाली असून यामुळे 2 हजार 700 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली व कलकत्ता या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग (आरोग्य तपासणी)  सुरु केलेली आहे.
अशा प्रवाशामधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा  व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही ही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमामार्फत (आयडीएसपी ) करण्यात येत असून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूचा रोगप्रसार : या विषाणूचा प्रसार नक्की कशामुळे होतो याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे सवरूप पाहता, शिंकणे खोकणे या वाटे हवे मार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा असा एक अंदाज आहे.
            या विषाणुकारिता कोणतेही लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. कोरोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
कोरोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे : अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, दमा लागणे, घसा बसने, श्वासास अडथळा, पचन संथेची लक्षणे.
कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी : या विषाणूचा उद्भव कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो हे निश्चितपणे माहित नसल्याने या संदर्भात निश्चित प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी यावर भाषा करणे कठीण असले तरी सर्वसाधारणपणे  आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी घेणे आवशयक आहे.
श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे. हाताची नियमित स्वच्यता ठेवणे. न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये. खोकताना शिंकताना नका- तोंडावर रुमाल / टिश्यू पेपरचा वापर करावा
खालील प्रकारच्या व्यक्तिनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा : स्वस्नास त्रास होणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू,बाधित देशात प्रवास केला असे व्यक्ती.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...