Saturday, February 15, 2020


पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत
बँक शाखास्तररावर मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 15:- जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेद्वारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय (Imcome Support) येत आहे. तसेच किसान क्रेडीट योजनेंतर्गत बँकांमार्फत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात आवश्यक त्या वेळी एकाच कर्जखात्यामधून सुलभ सोप्या कार्यपद्धतीद्वारे शेती अनुषंगीक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडीट कार्डद्वारे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी किसान क्रेडीट कार्ड वाटप झाल्यामुळे सुलभ कर्जाच्या सोयी सुविधा फायद्यापासून वंचित असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी दि. 8 फेब्रुवारी, 2020 ते दि. 23 फेब्रुवारी, 2020 या पंधरवाड्यात मोहिम राबवून पी. एम. किसान योजनेत ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अद्यापपर्यत वाटप झालेले नाही, अशा सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना नवीन किसान क्रेडीट कार्ड वाटप करावे अशा सूचना केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
 ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहेत, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करणे, अक्रियाशील कार्ड असल्यास क्रियाशील करणेसाठी प्रोत्साहीत करणे तसेच कार्ड धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये सहभागासाठी प्रोत्साहीत करणे या बाबीचा देखील सदर मोहिमेत समावेश करण्यात आलेला आहे.
सदर मोहिमेतंर्गत पी. एम. किसान पोर्टलवरील माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात 420141 इतके शेतकरी पात्र आहेत. त्यामुळे जलद गतीने पात्र वंचित शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी बँक शाखास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी आदेशीत केलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये बँकांनी पात्र शेतकऱ्याद्वारे एक पानी सुलभ अर्जाद्वारे माहिती घेणे व संबंधित तलाठी / महसूल अधिकारी यांनी मेळाव्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे किसान क्रेडीट कार्ड वाटप व कर्जमागणी अर्जावर कार्यवाही करतांना शेतकऱ्यांना प्रक्रिया खर्च, कागदपत्राचा खर्च, तपासणी फी, इतर आकार तथा सेवाशुल्क बँकांनी माफ करणेबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात दि. 17 फेब्रुवारी, 2020 व दि. 18 फेब्रुवारी, 2020या दोन दिवशी बँक शाखास्तरावर किसान क्रेडीट कार्ड वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अद्यापपर्यत वाटप झालेले नाही, अशा सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहणेबाबत आवाहन जिल्हाधिकारी,अरुण डोंगरे व जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...