Thursday, January 9, 2020


जिल्हास्तरीय हातमाग कापड
प्रदर्शनाचे नांदेड शहरात आयोजन
नांदेड, दि. 9 :- राज्य शासनाचे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत आयुक्त वस्त्रोद्योग विभाग यांचे मंजुरीने हातमाग कापड प्रचार प्रसार व विक्री विकास पंचवार्षिक कार्यक्रमाप्रमाणे नांदेड शहरातील सौभद्र मंगल कार्यालय शिवमंदीर चैतन्यनगर तरोडा नांदेड याठिकाणी 11 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत मकरसंक्राती सणाचे औचित्य साधून 11 दिवसासाठी जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शन  व विक्रीचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूरद्वारे करण्यात आले आहे.
प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेशासह खुले राहणार आहे. प्रत्यक्ष हातमाग कापड उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी एकाच ठिकाणी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील हातमाग कापड उत्पादित करणारे तीस हॅन्डल्यूम मार्क नोंदणीकृत सहकारी संस्था, हातमाग बचतगट, शिखर संस्था महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर इद्रायणी हॅन्डल्यूम, महाटेक्स सहभागी होणार आहे. त्यांनी उत्पादित केलेली खादि कापड, साड्या नऊ वारी साड्या, धोती कुर्ता कापड कोसा सिल्क कापड, चादरी, टावले, बेडसिटस, लहान मोठ्या संतरज्या इत्यादी प्रकारचे कापड विक्रीस ठेवण्यात येणार आहे. खरेदी करण्यात आलेल्या कापडावर 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. नांदेडकर वासियांनी याचा लाभ घ्यावा. हातमाग विणकर कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांनी तयार केलेल्या कापडाला योग्य बाजारपेठ मिळून देऊन हातमाग कापडाचा प्रचार प्रसार होणेसाठी जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शनचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूरद्वारे शासनाचे माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. नांदेडकर वासियांनी हातमाग कापड खरेदी करुन प्रतिसाद दयावा, असे आवाहन प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...