Tuesday, January 14, 2020

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करा  - अशोक चव्हाण*

मुंबई, 14 :  नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले. 
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रलंबित कामासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. 
श्री. चव्हाण म्हणाले की, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यामुळे हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका यांची खरेदी, स्वच्छतेसाठी मनुष्यबळाची नियुक्ती, मलशुद्धीकरण केंद्र उभारणे, मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम आदी कामांच्या निधीसाठी जिल्हा नियोजन तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. 
००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   404   लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये  मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 3 मे :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2...