Monday, January 27, 2020


सुधारीत वृत्त क्र. 111
समाजातील गरजु व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी
शासकिय सेवा, योजनांचा रविवारी महामेळावा

नांदेड, दि. 27 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या किमान कार्यक्रमांतर्गत व नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, नांदेड व डॉ. झाकीर हुसैन शिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील गरजु, आर्थिकदृष्टया मागासलेल्या व्यक्तींना, योग्य न्याय मिळण्याच्या उद्देशाने देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महाशिबीराचे आयोजन रविवार 2 फेब्रुवारी 2020 रोजी हजरत फातेमा मुलींचे ऊर्दु हायस्कुल गाडेगाव रोड देगलुर नाका नांदेड येथे करण्यात आले आहे.
या महाशिबीरात अटल पेन्शन योजना, मतदार नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमधील नावात दुरुस्ती, नविन आधारकार्ड नोंदणी, दुरुस्ती, उत्पन्न दाखला, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुंटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत योजना,  माता व बालसंगोपन कार्यक्रम योजना, विविध योजना, महसूल खातेफोड, उतारा दाखले, पशुसंवर्धन योजना, एसटी महामंडळ योजना, आर.टी.ओ. कार्यालयाच्या विविध सेवा, कृषी विभागाच्या योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी सर्व शासकिय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा या शिबीरात नागरिकांना प्रत्यक्ष त्या ठिकाणीच लाभ मिळणार आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी नांदेड शहर व नांदेड तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो, इत्यादी कागदपत्रे येतांना सोबत आणावे व लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष दिपक अ. धोळकिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे सचिव यांनी केले असून हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...