Thursday, January 23, 2020


दहावीतील विद्यार्थ्यांची कलचाचणी,
अभिक्षमता चाचणीस घेण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 23 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2020 इयत्ता दहावीतील काही विद्यार्थ्यांची कलचाचणी व अभिक्षमता चाचणी घेण्यात न आल्याने या चाचणीसाठी 23 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या चाचणीस नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांचे मुख्याध्याक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.  यापूर्वी ही कलचाचणी व अभिक्षमता चाचणी नियोजनाप्रमाणे 27 डिसेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत घेण्यात आली होती, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...