Monday, January 13, 2020


नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली
नगरपरिषद / नगरपंचायतीच्या रिक्त पदांची पोटनिवडणूक  
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यातील नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली नगरपरिषद / नगरपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमाची अनुसूची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रसिद्ध केली आहे.  
या अनुसूचीत नायगाव प्रभाग क्र. 1 जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नायगाव तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे, नायगाव नगरपंचायत मुख्‍याधिकारी गंगाधर ईरलोड हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण नगरपंचायत कार्यालय नायगाव. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण नगरपंचायत कार्यालय नायगाव असून मतमोजणीचे ठिकाण- नायगाव नगरपंचायत सभागृह हे राहील.  
धर्माबाद प्रभाग क्र. 2-अ, 4-अ एकुण 2 जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्माबादचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धर्माबाद तहसिलदार दत्तात्रय शिंदे, धर्माबाद नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी मंगेश देवरे हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण- नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद असून मतमोजणीचे ठिकाण- नगरपरिषद सभागृह प्रशासकीय इमारत नगरपरिषद धर्माबाद हे राहील. 
हिमायतनगर प्रभाग क्र.13 जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हदगाव उपविभागीय अधिकारी महेश वडदकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हिमायतनगर तहसिलदार नरसिंग जाधव, हिमायतनगर नगरपंचायत मुख्‍याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे या आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण तहसिल कार्यालय हिमायतनगर. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण तहसिल कार्यालय हिमायतनगर. मतमोजणीचे ठिकाण- तहसिल कार्यालय हिमायतनगर हे राहील.
बिलोली प्रभाग क्र. 5-अ जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झडके तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बिलोली तहसिलदार विक्रम राजपूत, बिलोली नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी त्र्यंबक कांबळे हे आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्‍याचे ठिकाण- मुख्याधिकारी यांचे दालन नगरपरिषद बिलोली. नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचे व नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचे ठिकाण- मुख्याधिकारी यांचे दालन नगरपरिषद बिलोली असून मतमोजणीचे ठिकाण- नगरपरिषद बिलोली हे राहील, असे नमूद केले आहे.
जिल्ह्यातील नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली नगरपरिषद / नगरपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र देण्‍याची व घेण्‍याची सुरुवात सोमवार 13 जानेवारी 2020 सकाळी 11 वाजल्‍यापासून सुरु झाली आहे. नामनिर्देशनपत्र भरण्‍यासाठी अंतिम दिनांक व वेळ शुक्रवार 17 जानेवारी 2020 (स.11.00 ते दुपारी.3.00 पर्यंत). नामनिर्देशनपत्र अर्जाची छाननी करण्‍याचा वेळ व दिनांक- शनिवार 18 जानेवारी 2020 सकाळी 11 वाजल्‍यापासून राहील. वैध नामनिर्देशित उमेदवाराची यादी प्रकाशित करण्‍याचा दिनांक- शनिवार 18 जानेवारी 2020 आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍यासाठीचा अंतिम दिनांक- अपिल नसेल तेथे गुरुवार 23 जानेवारी 2020 पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत. अपिल असेल तेथे अपिलाचा निर्णय ज्‍या तारखेस करण्‍यात येईल त्‍या तारखेनंतर तिस-या दिवशी किवा तत्‍पूर्वी मात्र सोमवार 27 जानेवारी 2020 पर्यत. निवडणूक लढविणा-या उमेदवाराची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा व चिन्‍ह नेमून देण्‍याचा दिनांक- उमेदवारी मागे घेण्‍यासाठीच्‍या शेवटच्‍या दिवसानंतरच्‍या लगतच्‍या दिवशी. मतदान ज्‍या दिवशी घेण्‍यात येईल तो दिनांक व त्‍याचा कालावधी- गुरुवार 6 फेब्रुवारी 2020  रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मतमोजणीचा दिनांक व वेळ- शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.00 वाजल्‍यापासून राहील.
नामनिर्देशनपत्र स्विकारणे अथवा नाकारणे याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याच्‍या कोणत्‍याही निर्णयाविरोधात जर अपिलिय अधिका-याकडे अपिल करावयाचे असेल तर त्‍यासाठीचा अंतिम दिनांकाकरिता महाराष्‍ट्र नगरपरिषदा नगरपंचायती निवडणूक नियम 1966 चे नियम 15 पहा, असेही अनुसूचीमध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...