Wednesday, January 8, 2020


रस्ता सुरक्षा अभियान 2020
चित्रकला स्पर्धांचे आयोजन
नांदेड, दि. 8 :- रस्ता सुरक्षा अभियान 2020 च्या निमित्ताने नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी खुला असून स्पर्धेमधील विजेत्यांना परिवहन कार्यालयाकडून पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाने 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे सूचित केले आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा नागरिकांमघ्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार प्रसार होण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देश रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत.
चित्रकला स्पर्धेसाठी गट विषय पुढील प्रमाणे राहतील. छोटा गट (इयत्ता 1 ते 4 पर्यत)- रहदारीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट (इयत्ता 5 ते 8 पर्यत) सुरक्षित वाहतूक. वरिष्ठ गट (इयत्ता 9 ते 12 पर्यत) आदर्श वाहतूक व्यवस्था हा विषय राहील.
स्पर्धेच्या अटी शर्ती पूढील प्रमाणे आहेत. चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील चित्र काढून संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडे जमा करावेत. संबंधीत शाळेच्यावतीने प्रत्येक शाळेतून एका गटासाठी पाच सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवार 15 जानेवारी 2020 पर्यत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत. सदरील चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खिडकी क्र.7 वर जमा करावेत अधिक माहितीसाठी या कार्यालयातील दुरध्वनी क्र.(02462) 259900 वरिष्ठ लिपीक श्री. गाजुलवाड यांचा मोबाईल क्र.7875422228 वर संपर्क करावा. स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रामधुन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी कळविले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...