Wednesday, December 4, 2019


प्रधानमंत्री श्रम योगी मानधन  
असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 4 :- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) व राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS-Traders) सप्ताह 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत सहाय्यक कामगार कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सौ. दिक्षाताई धबाले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जीएसटी सहाय्यक आयुक्त डॉ. अविनाश चव्हाण, सांख्यिकी अधिकारी एन. जी. बास्टवार, गांधी आंबेडकर मजूर संघटनेचे अध्यक्ष अॅड. विष्णु गोडबोले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलित करुन झाले.
यावेळी महापौर श्रीमती धबाले यांनी असंघटीत कामगारांसाठी समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवून या योजनेची माहिती देऊन याचा लाभ असंघटीत कामगारांना जास्तीत जास्त मिळवून दयावा, असे  प्रतिपादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री खल्लाळ यांनी या योजनेबाबत मत मांडताना भूतकाळातील उदाहरणे देऊन योजनेचे महत्व अधोरेखित केले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे मदत करेल असे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकात जास्तीत जास्त पोहचावे या योजनेच लाभ घ्यावा, असे अवाहन केले.
या पेन्शन योजनेत वय 18 ते 40 या वयोगटातील कामगारांना नोंदणी करता येते. वयानुसार कामगारांनी हप्ता भरणे आवश्यक आहे. जेवढी रक्कम कामगार भरणार तेवढीच रक्कम केंद्र शासन जमा करणार आहे. वय 18 पासून वयाच्या 60 वर्षापर्यंत लाभार्थी हप्ता जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थी 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेंतर्गत असंघटित कामगार जसे रिक्षाचालक, घरकाम करणारे, फेरीवाले, गृहउद्योग करणारे, वीटभट्टी, चर्मकार, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, मच्छीमार, मासे उत्पादक, मासे सफाई करणारे कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, हातमाग कामगार, चर्मउद्योग कामगार आणि अन्य व्यवसाय करणारे कामगारांचा समावेश करण्यात आला आहे.
जीएसटी विभागाचे प्रकाश गोणार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चामालवार, डॉ. बोनगुलवार, श्रीमती जयसवाल, कार्यक्रमाचे गांधी आंबेडकर मजूर संघटना विष्णु गोडबोले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माथाडी निरीक्षक डी. पी. फुले यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन. अ. सय्यद, ए. डी. कांबळे सुविधाकर देगलूर, एस. ए. जुगदार सुविधाकर किनवट, श्रीकांत भंडारवार सुविधाकर, अनवर शेख सुविधाकर कंधार, सुखदेव राठोड, श्री.वाघाळकर, असगर हुसेन, मोहम्मद अल्ताफ, प्रकाश शिरसाठ, मनोज घोडगे, मंगेश इज्जपवार, श्री राचुटकर, अश्विनी शिरडकर यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन अॅड. विष्णु गोडबोले तर आभार श्री. फुले माथाडी निरिक्षक यांनी मानले.
याप्रसंगी या योजनेला यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध घटक, सेवा भावीसंस्था व सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेने उस्पृतपणे पुढे यावे जेणे करुन या योजनेची यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन आयोजक सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद यांनी सांगितले.
000000

No comments:

Post a Comment