Thursday, December 26, 2019


जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला,
 मसाला पिके स्पर्धा प्रदर्शन संपन्न    
नांदेड, दि. 26 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने फळे, भाजीपाला मसाला पिके प्रदर्शन घेण्यात आले. या जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्सपुर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये 447 नमुने प्राप्त झाले असून 224 भाजीपाला, 175 फळे मसाला पिके 48 नमुन्याचा समावेश होता.
ज्ज्ञ समिती मार्फत 25 डिसेंबरला निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या नमुन्यामध्ये पिकनिहाय प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले. यावेळी समितीचे प्रमुख गजानन हुंडेकर मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, तालुका कृषि अधिकारी श्री घुमनवाड, तंत्र अधिकारी श्री अंबूलगेकर पंचायत समितीचे कृषि अधिकारी शैलेश वाव्हळे यांचा समावेश होता.
या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी, भाविकांनी उत्सपुर्तपणे सहभाग नोंदविला आहे. अशा प्रकारच्या स्पर्धामुळे शेतकऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होते. यावेळी शेतकरी भाविक मोठया प्रमाणात भेट देत आहे. अशी माहिती कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...