Wednesday, December 18, 2019


अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजना
कागदपत्रांच्या मुळ प्रती तपासून घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 :- अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचतगटांनी 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजनेत ज्या बचत गटांनी त्रुटींची पूर्तता केली आहे अश्या बचत गटांना त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासणीसाठी नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात वेळ देण्यात येईल. या सर्व बचतगटांचे अध्यक्ष व सचिव यांनी 23 ते 30 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयात येवून गटातील सर्व सदस्यांचे मूळ प्रमाणपत्र तपासून घ्यावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. तसेच शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन 2018-19 या वर्षात ज्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला होता त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. सदर त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दिनांक 12 डिसेंबर 2019 पर्यंत वेळ देण्यात आलेला होता.
ज्या बचत गटांनी त्रुटींची पूर्तता केलेली आहे अश्या बचत गटांना त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासणीसाठी नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात वेळ देण्यात येईल. या सर्व बचतगटांचे अध्यक्ष व सचिव यांनी 23 ते 30 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयात येवून गटातील सर्व सदस्यांचे मूळ प्रमाणपत्र तपासून घ्यावेत. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग नसेल, तसेच आपला कुठलाही दावा मान्य करण्यात येणार नाही, असे अहवान वाहन तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...