Monday, November 25, 2019


आयर्न गोळ्यांमुळे शालेय विद्यार्थी सशक्‍त होतील
      जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर
नांदेड दि. 25 :- शालेय विद्यार्थ्‍यांना आयर्नच्‍या नियमित गोळया दिल्‍यास रक्‍तक्षयाचे प्रमाण कमी होऊन शालेय विद्यार्थी शक्‍त होतील. शाळा व अंगणवाडीमधून दर सोमवारी आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे विद्यार्थ्‍यांना द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगावकर यांनी  केले.  
 सशक्‍त विद्यार्थी अभियान अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रम हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे सोमवार 25 नोव्‍हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.  
यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्‍य व शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, सरपंच सुनिता धुरमुरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, उपसरपंच रंजना पवार, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. संदेश पोहरे, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी सुधिश मांजरमकर, गट शिक्षणाधिकारी रमेश संगपवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री. मिसाळे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांची आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍यावतीने विशेष काळजी घेतली जाते. सशक्‍त विद्यार्थी अभियानांतर्गत जिल्‍हाभरात सुरु असलेल्‍या कार्यक्रमात गरोदर माता, शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील बालक यांना सशक्‍त करण्‍याची मोहिम जिल्‍हा परिषदेने हाती घेतली आहे. या मोहिमेची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे म्हणाले, आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे मुलांना दिल्‍यास कुपोषण मुक्‍तीसह मुलांची शारीरिक वाढीसह बौध्‍दीकदृष्‍टया ते विकसित होऊन भावी पिढी सशक्‍त व सदृढ बनेल. बालकांमधील रक्‍तक्षय टाळण्‍यासाठी योग्‍य व सकस आहार घेणे महत्‍वाचे आहे. सशक्‍त शरीर, बुध्‍दी, मन याची जाणीव विद्यार्थी व पालकांना होणे आवश्‍यक आहे. तसेच बालकांचे पोषण होण्‍यासाठी लोह आणि कॅल्शियम महत्‍वाचे आहे. म्हणूनच आपण दूर्गा बाल महोत्‍सव ही योजना प्रत्‍येक अंगणवाडीमध्‍ये राबविली आहे. यात सर्व गरोदर महिला स्‍वत:चा डबा घेऊन एकमेकींना आहाराची देवाण-घेवाण करुन एकत्रितपणे जेवण करुन गप्‍पा मारतात. यामुळे सर्व प्रकारच्‍या व्हिटॅमीनची अन्‍न मिळून हिमोग्‍लोबिन वाढण्‍यास मदत झाल्‍याचे दिसून आल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले.   आज या विशेष अभियानांतर्गत जिल्‍हयातील सुमारे 2 हजार 530 जिल्‍हा परिषद शाळा व 3 हजार 600 अंगणवाडीमधून विशेष मोहिम राबविण्‍यात आली. या मोहिमेमध्‍ये पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व पालकांच्या सहकार्यातून ही मोहिम यशस्‍वी झाली आहे.
सुरुवातीला क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व धन्‍वंतरी देवीची पूजा करुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिप प्रज्‍वलन करुन सशक्‍त विद्यार्थी अभियान च्या जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्‍यावतीने मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. उपस्थित बालकांना आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया देण्‍यात आल्‍या. यावेळी स्‍वच्‍छ हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात आले. गाव शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त करण्‍यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्‍ता व पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे संजय चहांदे यांनी सरपंचांना पत्र दिले आहे. या पत्राची प्रत जवळगाव येथील सरपंच सुमनबाई धुरमुरे यांना देण्‍यात आली.
या कार्यक्रमाला जिलहा परिषदेचे मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम, सुभाष खाकरे, विस्‍तार अधिकारी डी. आय. गायकवाड, राजीव क्षीरसागर, ग्राम विकास अधिकारी शैलेश वडजकर, श्रीरंग पवार, उत्‍तमराव पवार, गंगाधरराव पांचाळ, नारायण बासरकर, पांडूरंग पवार, शंकरराव धरमुरे, रावसाहेब पवार, सुभाष माने, संजय माने, संतोष हातागळे, अंगणवाडी कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, गरोदर माता, शालेय विद्यार्थी आदींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...