Wednesday, November 20, 2019


मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
अभ्यासाबरोबर खेळाला महत्व दिले पाहिजे  
-          जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 20 :- मुलांचा बौद्धीक विकासाबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालमहोत्सवाचे आयोजन आवश्यक असून त्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने निराधार, निराश्रीत बालकाश्रमातील मुलांसाठी 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधुन तीन दिवसीय (17 ते 19 नोव्हेंबर) चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन वाडी पाटी येथील बालकाश्रमात करण्यात आले होते.या बालमहोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, या बालमहोत्सवाच्या निमित्त तीन दिवस विविध मैदानी व सांस्कृतीक स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळून शारीरीक व मानसिकदृष्टया सक्षम होतील. या महोत्सवाच्या आयोजनामुळे महिला व बाल विकास कार्यालयाने निराधार, निराश्रितांच्या चेहऱ्यावर हसु फुलवण्याचे कार्य केले आहे. जिल्हा प्रशासन बालकांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची  पुर्तता करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम म्हणाल्या बालके ही उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहेत आणि त्यांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी तसेच त्यांच्या दिनचर्येत बदल व्हावा, त्यांना आनंद मिळण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांची माहिती इतरांना व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती डॉ. निरंजन कौर सरदार अध्यक्ष बाल कल्याण समिती ॲड. सावित्री जोशी, डॉ. सीमा लटुरिया, डॉ. सुरेखा कलंत्री यांची उपस्थिती होती. कै. सोपानराव तादलापुरकर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वधर्म समभाव वेशभुषा धारण करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी व डेरला येथील मुलांनी सहभाग नोंदवला.
            हा बालमहोत्सव तीन दिवस आयोजित करण्यात आला होता त्यात दोन दिवस विविध मैदानी खेळासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर 19 नोव्हेंबर रोजी सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला त्यात एकल गायन समुह गायन एकल नृत्य व समुह नृत्य स्पर्धो पार पडल्या यात 9 स्वंयसेवी संस्था परिसरातील शाळेचे जवळपास पाचशे बालके सहभागी झाले होते.
बालमहोत्सवाचे समारोपात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) मिलींद वाघमारे, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. गणेश जोशी, श्री पवळे मुख्याध्यापक जि.प.प्रा. डेरला हे उपस्थित होते त्यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यातील विजेत्यांना विभागीय स्तरावरील बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश जोंधळे यांनी केले तर बालमहोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती काळम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी श्री. घुमे  श्री. खानापुरकर, श्री. दवणे, श्रीमती सोनकांबळे, श्री दरपलवार, श्री बडवणे तसेच बाल संरक्षण कक्षाच्या श्रीमती राठोड व त्यांचा कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री लालबाजी घाटे यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सर्व सुविधेसह जागा उपलब्ध करुन दिली आणि आभार श्री  सावळे यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...