Saturday, October 19, 2019


मतदान जनजागृती शपथ
मतदानाच्या दिवशी मतदानासाठी
 सुट्टी अथवा दोन तासांची सवलत  
             नांदेड, दि. 19 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत विविध आस्थापनात मतदान जनजागृती शपथ देण्यात आली आहे.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी शासनाने सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदानासाठी भर पगारी सुट्टी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मौल्स व्यापारी संकूल इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता भरपगारी सुट्टी द्यावी व त्यांच्या वेतनातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना सवलत देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदविता येणार आहे. खाजगी क्षेत्रातील आस्थापणातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सोमवार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध आस्थापनांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून भेटी देऊन कामगारांनाकडून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करुन शपथ देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पायोनिर डिस्ट्रिलिज, व्यंकेज इंडिया लि. सिट्रस प्रा. लि. कृष्णुर व साई सिमरन ऑईल इंडस्ट्रीज, श्रीनिवास कॉटल फिड्स व कोहिनुर कॉटल फिड्स लि. एमआयडीसी नांदेड तसेच डीमार्ट फरांदे होंडा सर्व्हीस प्रा. लि. कासलीवाल  कलेक्शन बाफना ज्वलर्स इत्यादी आस्थापनांना भेटी देण्यात आल्या, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...