Friday, October 11, 2019


कमी मतदान टक्केवारी असणाऱ्या
मतदान केंद्रासाठी स्वीप टिमचे उपक्रम  

नांदेड,दि. 11:- विधासभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 87 नांदेड दक्षिण मतदार संघात स्वीप टिमद्वारे कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रावर बुथची तपासणी करुन तेथील सुविधांची पाहणी करण्यात आली. आदर्श मतदान केंद्रासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
स्वीप टिम पथकाने नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या दहा मतदान केंद्राच्या भागात विशेष कार्यक्रम घेवून लाऊड स्पीकरद्वारे घोषवाक्य देत मतदान जागृती रथ संपूर्ण विभागात फिरवण्यात आला, मतदान जागृतीचे काम करण्यात आले. या मतदार संघामध्ये मल्टिपर्पज हायस्कूल , 67,68,69, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 28 , खालसा हायस्कूल 11 , नांदेड वाघाळा मनपा स्कूल 57, शिवाजी विद्यालय 217, प्रज्ञानिकेतन 145, एनडब्ल्युएमपी वाचनालय किलारोड 140, कळगीधर स्कूल 45 अशा सर्व बुथ असणाऱ्या विभागातील नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनखाली तहसीलदार अरुण जऱ्हाड, नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी स्वीप टिम प्रमुख नयना पवार तसेच मुसाने राजकुमार , पंकज हाके, सारिका आचमे, वंदना वाघमारे, कर्वेडकर कौशल्या अनिल बस्वदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...