Tuesday, October 1, 2019


लोकशाही मजबुतीसाठी
दिव्‍यांग मतदारांचा मतदानातील सहभाग आवश्‍यक
नांदेड दि. 1 :- भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी व प्रबळ लोकशाही आहे. सामान्‍य मतदार लोकशाहीचा आधार असतो म्‍हणुन जेवढे जास्‍त नागरीक मतदान प्रक्रीयेत सहभागी होतात तेवढी ती यशस्‍वी समजली जाते. मतदान प्रक्रीयेत सर्व दिव्‍यांग मतदारांनी सहभागी होण्‍याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2019 साठी भारतीय निवडणुक आयोगाने 21 ऑक्‍टोंबर 2019 रोजी होत असलेल्‍या मतदानासाठी दिव्‍यांग मतदारांचा सहभाग वाढविण्‍यासंदर्भात निवडणुक आयोगाने दिव्‍यांग मतदार जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
आयोगाने या संदर्भात दिव्‍यांग मतदारांसाठी काही विशेष उपक्रम हाती घेतले असून या देशातील वय वर्ष अठरा पुर्ण करणारा प्रत्‍येक नागरीक मतदान प्रक्रीयेत भाग घेवु शकतो. प्रत्‍येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्‍यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्‍येक दिव्‍यांग मतदारांमध्ये वाढली पाहीजे यादृष्‍टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा भाग म्‍हणुन मतदान केंद्रावर विशेष सोई-सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. स्‍वतंत्र वाहतुक व्‍यवस्‍था, व्‍हील चेअर, रॅम्‍प, मदतनीस, पिण्‍याचे पाणी, ब्रेललिपीतील मतपत्रीका तसेच इतर सुविधा पुरविण्‍यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 087- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार अरुण ज-हाड, नायब तहसीलदार सौ. उर्मीला कुलकणी, पीडब्‍लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा.डॅा.सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील हे परीश्रम घेत आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...