Monday, October 14, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान
करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत  
            नांदेड, दि. 14 :- लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या नियम 135 नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता  यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते  किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.
भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 21 ऑक्टोंबर 2019  रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी शासन परिपत्रकानुसार खालीलप्रमाणे सुचीत करण्यात आले आहे.
निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी  यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
ही सुट्टी उद्योग, ऊर्जा कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापणा, कारखाने. दुकाने आदींना लागू राहील. (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना सर्व दुकाने इतर आस्थापणा निवासी हॉटेल, खाद्यगृहे,अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मौल्स रिटेलर्स इत्यादी).
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ 2 ते 3 तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी  घेणे आवश्यक राहील.
नमूद केल्याप्रमाणे उद्योग, ऊर्जा कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना कारखाने. दुकाने इत्यादींच्या मालकांणी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल  याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त झाल्यास मतदान करता येणे शक्य झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.
सर्व उद्योजक आस्थापना मालकांना त्यांचा उद्योगात, आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदार कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना वर नमूद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत देण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांच्याकडून  आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...