Wednesday, October 16, 2019


पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार याद्या
नव्‍याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
दावे हरकती स्विकारण्याची 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
नांदेड दि. 16 :- पदवीधर व शिक्षकसंघाच्‍या मतदार याद्या नव्‍याने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्‍या मतदार यादी नव्‍याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.  
पुनरिक्षणाचे टप्पे व कालावधी पुढील प्रमाणे राहील. नमूना 18 किंवा 19 व्‍दारे दावे व हरकती स्‍वीकारण्‍यांचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्‍हेबर 2019 आहे. हस्‍तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई मंगळवार 19 नोव्‍हेंबर 2019. प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी शनिवार 23 नोव्‍हेंबर 2019 ते सोमवार 9 डिसेंबर 2019 आहे. दावे व हरकती निकाली काढण्‍याचा दिनांक व पुरवणी गुरुवार 26 डिसेंबर 2019 असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 होणार आहे.
 भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड तालुक्‍यातील पदवीधर व शिक्षक  मतदारांना मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्‍वये पदवीधर व शिक्षक संघाच्‍या मतदार यादया नव्‍याने तयार करण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्‍द करण्‍यांत येत आहे. या प्रसिध्‍दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...