Friday, September 20, 2019

बालशक्ती पुरस्कार, बालकल्याण पुरस्कार-2019 साठी
अर्ज स्वीकारण्याची 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.
बालशक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय पाचपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
वैयक्तिक पुरस्कार मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवा उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बाल शक्ती पुरस्कार 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. आता ती दिनांक 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...