Friday, September 27, 2019


फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्या

            नांदेड, दि. 27:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामाकरीता जिल्‍हादंडाधिकारी यांनी निर्देशीत केलेले निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, फिरते पथक प्रमुख (Flying Squad Incharge) स्‍थायी निगरानी पथक प्रमुख (Static Surveillance Team Incharge) यांना शासनाने संदर्भात नमुद अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नेमणूक केली असून, उक्‍त संहितेचे कमल 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान केल्या आहेत.
             नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरूण डोंगरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्तीचा वापर करून नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट,  84-हदगांव,  85-भोकर,  86- नांदेड उत्‍तर,  87- नांदेड दक्षिण,  88-लोहा, 89-नायगांव,  90-देगलूर, 91-मुखेड अशा (09) विधानसभा मतदार संघामध्‍ये, निवडणूकीच्‍या कामासाठी (09) निवडणूक निर्णय अधिकारी व (27) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती झाली असून त्‍यापैकी 08 निवडणूक निर्णय अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी असल्याने तसेच (16) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी पदी असल्याने विकादं पदसिध्‍द आहेत उर्वरीत (01) 86-नांदेड उत्‍तर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, (रोहयो)  सदाशिव पडदुने व नियुक्‍त (11) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्‍या कामासाठी निर्माण केलेल्‍या स्‍थायी निगरानी पथक (Static Surveillance Team), संख्‍या (116) आणि फिरते पथक संख्‍या (110) (Flying Squad Team) यांचे प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो दिनांक 21 सप्टेंबर, 2019 ते दिनांक 27 ऑक्टोबर, 2019 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे आणि अशाप्रकारे नियुक्‍त केलेल्‍या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्‍त संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली शक्ती प्रदान करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...