Saturday, August 3, 2019


नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्हा
विभागीय स्‍तरावरील प्रशिक्षण वर्ग व चर्चा सत्र
 डिजीटल इंडीया भुमिअभिलेख
आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 3 :- जमाबंदी आयुक्‍त पुणे व औरंगाबाद विभागीय आयुक्‍त यांच्‍या निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्‍हा नियोजन भवन येथे डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे एक दिवसीय विभागीय स्‍तरावरील प्रशिक्षणसत्राचे आयोजन शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी करण्‍यात आले होते.   
या कार्याक्रामाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांचे हस्‍ते करण्‍यात आले असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशोक काकडे, मनपा आयुक्‍त लहुराज माळी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक संजय जाधव, हे उपस्थित राहुन प्रशिक्षणार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपस्थित होते. 
जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा शासनाचा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अचूक, संगणकीकृत व डिजीटल स्‍वाक्षरियुक्‍त ना.नं.न. 7/12 व 8 अ उपलब्‍ध होणार असल्‍याने आणि सर्व फेरफार ऑनलाईन पध्‍दतीने होत असल्‍याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम कमी होणार आहे.  संगणकीकरणामुळे 7/12 अभिलेखात येणारी सुरक्षितता व पारदर्शकतेबाबत आपले विचार व्‍यक्‍त केले.

या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्‍हयासह लातुर, परभणी व हिंगोली या जिल्‍हयाचे निवासी उपजिल्‍हाधिकारी, सर्व जिल्‍ह्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी,  तहसिलदार, नायब तहसिलदार तथा डीबीए तसेच प्रत्‍येक तालुक्‍यातील  दोन मंडळ अधिकारी व दोन तलाठी असे सुमारे 500 अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाचे डिजीटल इंडीया भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम प्रकल्‍पाचे राज्‍य समन्‍वयक तथा उपजिल्‍हाधिकारी रामदास जगताप यांनी दोन सत्रामध्‍ये ई-फेरफार प्रणाली अंतर्गत विकसीत करण्‍यात आलेल्‍या विविध संगणकीय अज्ञावली वापराची कार्यपध्‍दती / सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देवून संगणक प्रणालीमध्‍ये प्रत्‍यक्ष अंमलबजाणीत येणाऱ्या अडचणीबाबतचे  चर्चासत्राद्वारे शंकानीरसन केले.  
या कार्यशाळेची प्रस्‍तावना निवसी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केली तर कार्यक्रामाचे सुत्रसंचलन संगायो तहसिलदारश्रीमती वैशाली पाटील, यांनी केले. कार्यक्रमांचे संपुर्ण नियोजन जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्‍ल कर्णेवार यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडले. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...