Monday, August 26, 2019


राष्ट्रीय क्रीडा दिननिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रीय खेळाडूंचा गुरुवारी सत्कार
नांदेड दि. 26 :-  क्रीडा दिनचे औचीत्य साधुन या कार्यालयामार्फत हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, थलेटिक्स (50 मीटर 100 मी.धावने), बॅडमिंटन, बास्केटबॉल रोलर स्केटींग या खेळाच्या 14 वर्षाआतील मुले-मुली यांची 28 ते 29 ऑगष्ट 2019 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडीयम परीसर नांदेड येथे अंतर्गत स्पर्धा आयोजीत करुन प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा दि. 29 ऑगष्ट 2019 रोजी दुपारी 3 वा. जिल्हा क्रीडा संकल, इनडोअर हॉल येथे संपन्न होणा-या मुख्य कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हयातील सन 2018-19 या शैक्षणीक वर्षात संस्था, क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालयातील राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्रथम, द्वितीय तृतिय क्रमांक प्राप्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याकरीता सदर खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 27 ऑगष्ट,2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठविण्यात यावे.
क्रीडा युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने  राज्याक्रीडा खेळाचा प्रचार, प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश ठे 29 ऑगष्ट हा दिवस हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. तसेच युवक-युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव वातावरण निर्माण होणार नाही. तोपर्यंत ऱ्या आर्थाने क्रीडा खेळांची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने सन 1991-92 यावर्षीपासुन दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात ले आहे.
गुरुवार 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे व्यापक स्वरुपात आयोजन करण्यासाठी जास्तीतजास्त खेळाडू, नागरिक, युवा, लहान मुले, सामान्य वर्गातील व्यक्ती या मैदानामध्ये खेळताना दिसले पाहिजे ही संकल्पना आहे. यासोबतच आजची पिढी ही मोबाईल, गॅझेट त्यावरील विविध खेळ, इंटरनेट, व्हिडीओ गेम आदी आधुनिक गोष्टीकडे झुकलेले / आकर्षित होत असल्यामुळे त्यांचे बालपण लोप पावलेले निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य हे कमकुवत होत आहे. परिणामी अनेक आजार व्याधी लहान वयात बळावत आहेत.
याकरीता आपल्या पिढीच्या बालपणी लोपावत असलेले जे पारंपारिक क्रीडा प्रकार, दैनंदिन मनोरंजनात्मक क्रीडा प्रकार म्हणून खेळले जात होते तसेच स्पर्धात्मक खेळ हाताच्या स्पर्धात्मक खेळांना पूरक असलेले (Leadup Games) म्हणून प्रचलित होते ते खेळ आयोजित करण्याची संकल्पना मांडण्यात येत आहे. जेणेकरुन त्या खेळाकडे मुले/ मुली आकृष्ट होतील त्यांच्या पालकांना आपल्या मुलांचे उपजत गुण हेरण्याची संधी मिळेल. त्यामधून आनंदासोबतच, शारीरिक मानसिक दृढता वाढण्यास मदत होत होती. उदा. सूर-पारंब्या, अंडा फोड, लगोरी, लिंबू-चमचा, काच-कवडया, टिपरी, लेझीम-ढोलपथके, गजगे, विटी दांडू, मामाचे पत्र हारवले, आंधळी कोशिंबिर, डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे, संगीत खुर्ची, डोंगर-पाणी, कंच्या खेळणे, बिटया खेळणे आदी याचबरोबर 6 ते 8 8 ते 10 वयातील बालकांसाठी 5 A-side Football / बेबी लिग तसेच थलेटिक्स या खेळातील काही निवडक खेळप्रकार जसे 50 मीटर धावणे, शटलरन, रिले, रेस आदीचे आयोजन करण्यास मान्यता प्राप्त आहे.
या स्पर्धेसाठी संपर्ककरीता अनुक्रमे हॉकी-  भुपेंद्रसिंघ मुनिम- 9011966105, फुटबॉल- श्री. अथर -8600357361, टेबल टेनिस- अनिल बंदेल (राज्य क्रीडा मार्गदर्शक)- 9604629561, थलेटिक्स- श्रीमती शिवकांता देशमुख- 9657092794, बॅडमिंटन- महेश वाखरडकर- 9960052344, बास्केटबॉल- विष्णु शिंदे-9767047525, रोलर स्केटींग- अलिम खान-9975635040 यांच्याकडे अधिक माहितीसाठी गुरुदिपसिंघ संधु, क्रीडा अधिकारी- 9423140617 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...