Sunday, August 11, 2019


दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 :- लातूर विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक परीक्षा (इयत्ता बारावी) फेब्रुवारी / मार्च 2020 करीता नवीन केंद्र मिळण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  
विहित नमुना अर्जाची किंमत 1 हजार रुपये असून प्रस्ताव अर्ज घेऊन जावेत तसेच हा प्रस्ताव पूर्णपणे भरुन या कार्यालयात शनिवार 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावीत. याबाबत लातूर विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...